तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री प्रशासन चालवतील; चंद्रकांत पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर

तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री प्रशासन चालवतील; चंद्रकांत पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या विधानाला उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.राज्यातील प्रशासन सध्या अतिशय व्यवस्थित सुरु आहे. परंतु तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. परंतु ताई तुम्ही काळजी करु नका. हे सरकार चालवित आहेत तसेच फिरतही आहे, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे परिसरातील कीर्तनकारांचा जाहीर सत्कार काल शनिवारी करण्यात आला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमची राज्यात अडीच वर्षे सत्ता नव्हती. विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले आहे. त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाही. जे घडायचे असते ते घडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झटपट निर्णय घेणार आहेत. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी ज्या सामाजिक सुधारणेच्या गोष्टी केल्या. यामध्ये त्यांनी झटपट निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिक्षणासोबत स्किल डेव्हलपमेंटवर जीवनदीप कॉलेजने भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ. अतिशय दुर्गम भागांत संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्यार्थ्यांची गरज पाहता या भागाला विधी महाविद्यालय दिले आहे, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : शिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप


 

First Published on: September 11, 2022 10:13 AM
Exit mobile version