काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने करावी, चंद्रकांत पाटलांचं खुलं आव्हान

काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने करावी, चंद्रकांत पाटलांचं खुलं आव्हान

काँग्रेस पक्षाने लहान मुलांसारखा खेळ केला होता. याबाबत समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटेल. एखाद्या पक्षातील अधिकृत नगरसेवकाला पक्षामध्ये प्रवेश द्यायचा की नाही यावर सुद्धा दोन पक्षांतील वाद हे क्लिकर झाले आहेत. प्रतिष्ठेमध्ये काँग्रेस संपली तर ती शहाणी होत नाहीये. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने करावी, असं खुलं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दिलं आहे. लोकप्रतिनिधींच्या मनातला आंद्रेश सुद्धा गुप्त मतदान पद्धतीने व्यक्त होईल. हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नियम न बदलता लोकशाही मार्गाने करावी. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. त्यासाठी मी दोघांचेही खूप अभिनंदन करतो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे मला खूप आनंद झाला आहे. पक्षाकडून बावनकुळे यांची तिकीट नाकारण्यात आली होती. तरीसुद्धा बावनकुळे यांनी संयम दाखवत पक्ष जे काही काम सांगेल ते काम त्यांनी पूर्ण केलं. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीची मतं फुटली

देशाचं भवितव्य हे मोदी आहे. काल वाराणसीमध्ये जो कार्यक्रम झाला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हिंदूंच्या मनातला अभिमान जागृत झाला. एकीकडे आयुष्याची हितीकर्तव्यता वाटली. त्यामुळे सर्व राष्ट्रीय विषय हे निवडून आलेल्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या प्रतिमेला जागवत असतात.

रविंद्र भोयर विरूद्ध चंद्रकांत पाटील

भाजपनं घोडेबाजार करत निवडणूक जिंकली. असा आरोप काँग्रेसमधले अपक्ष उमेदवार रविंद्र भोयर यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट कापलं होतं. त्यावेळी ते ऊर्जामंत्री होते. त्यांचं तिकीट कापणं आणि आज त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेचं उमेदवारी म्हणून आणणं. यामुळे निवडणुकीचा प्रकार असा असतो हे सामान्य जनतेलाही माहीतेय. परंतु आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार दिली असून भाजपाने घोडेबाजार केला की नाही. हे सुद्धा समोर येईल. दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधानसभेचं तिकीट कापणं हे वक्तव्य योग्य नाहीये. त्यामुळे अरेंजमेन्ट करताना एकमार्गी करायचं असतं. असं प्रत्यूत्तर चंद्रकांत पाटील यांनी रविंद्र भोयर यांना दिलं आहे.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडी सरकारचे १६ मत फोडण्यात भाजपला यश आलं आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली परंतु ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आला. परंतु छोटू भोयर यांना १ मत मिळाले आहे.


हेही वाचा : Corona vaccination : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर, मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न


 

First Published on: December 14, 2021 11:26 AM
Exit mobile version