दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात वेड..

दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात वेड..

दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात वेड..

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे असे विधान केलंय. दरेकरांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरेकरांचे वक्तव्याचा अश्लील अर्थ नाही. भाजपचाही मनात तसा अर्थ नाही आहे. वाक्प्रचारांचा अर्थ फिजिकली घ्यायचा नसतो जर तो घ्यायचा झाला तर वेड पांघरुन पेडगावला जाण्यासारखे आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्हाला दोष देत नाही पण तुम्ही लोकांची मानसिकता समजून निर्बंधांबाबत निर्णय घेतला पाहिजे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे म्हटल्यास न्यायालयाचा अवमान होईल असे दरेकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीवर प्रवीण दरेकर यांनी टीका करताना वाक्प्रचार वापरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, बरेच वाक्प्रचार आपण मराठीमध्ये सहजपणे आपण उच्चारत असतो. त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर ते वेड पांघरुन पेडगावला जाण्यासारखे आहे. ते वाक्प्रचार हे त्या त्या वेळी एखादा अर्थ समजावण्यासाठी म्हटलेलं असते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कुठल्या पद्धतीने म्हटलं आहे की, तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचे काही पडले नाही. जे श्रीमंत आहेत राजकीय दृष्ट्या प्रभावी आहेत. अशांचे तुम्हाला जास्त कळते. त्याच्यामुळे इतका गदारोळ करण्याचा कारण नाही. सगळेच महाविकास आघाडीतील पक्ष पॅनिक झाले आहेत यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करत आहे. परंतु याचा अश्लील अर्थ प्रवीण दरेकर यांच्या मनात नाही आणि आमच्याही मनात नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ओबीसी उमेदावर उभा करणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरसुद्धा अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण माझ्या माहितीनुसार देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश काढता येत नाही. त्यामुळे विधानसभा भरवून कायदा करावा लागेल. अध्यादेशाने भागणार नाही. आता एकच सर्व पक्षांच्या हातामध्ये आहे की, ज्या जागांवर ओबीसी उमेदवार होता हे माहिती आहे. तेवढ्या जागांवर ओबीसी उमेदवार उभे करा, एकूण १६८ पैकी २७ टक्के जागांवर प्रत्येक पक्षाने ओबीसी उमेदवाराद्वारे लढवायच्या आहेत. या जागा कुठे लढवायच्या हे प्रत्येक पक्षावर आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे म्हणणं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शक्य नाही. परंतु तसं जर सगळ्यांनी मिळून करायचे ठरवले तर त्यामध्ये भाजपसुद्धा आहे. पण तो सर्वोच्च न्यायालयाचा अनादर होईल आणि कायदेशीर गुंता होईल. सगळ्यांनी ठरवलं तर भाजप त्यांच्यासोबत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

निर्बंधांवरुन महाविकास आघाडीवर टीका

गणेश दर्शनावर झालेल्या गर्दीवर मत एवढा मोठा आपला भारतीय समाज आहे. या समाजाला दीड-दीड वर्ष डांबून ठेवल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त तो डांबून ठेवला जाऊ शकत नाही. याचा विचार करुन निर्णय घ्यावा लागेल. दोन वर्ष वारीला जायला न मिळणे म्हणजे काय हे १५ लाख वारकऱ्यांना जाऊन विचारा, तुम्हाला काय जातंय मंत्रालायत न जाता निर्णय घ्यायला, तुम्हाला दोष देत नाही पण तुम्ही लोकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. निर्बंध घालून लोकांवर कारवाई करणार त्यातून रोष निर्माण होणार आहे. मुलांना जास्तवेळ शाळांपासून दूर ठेवलं तर मुलं वेडी होतील. त्यांना वेडी करायचे असेल तर करा काय बोलणार असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

परप्रांतीय गुन्हे करतात का?

चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांची नोंद करण्यावरुन राज्य सरकारला सवाल केला आहे. परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? का ते महाराष्ट्रातला माणूस करत नाही का? असे एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. जर गुन्ह्यांचा अभ्यास केला तर वेगळं सत्य बाहेर निघेल मग त्याचे काय करणार तुम्ही ? त्याचीही नोंद ठेवणार का? असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष’; टीका करताना दरेकरांची जीभ घसरली


 

First Published on: September 14, 2021 1:27 PM
Exit mobile version