Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष'; टीका करताना दरेकरांची जीभ घसरली

‘राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष’; टीका करताना दरेकरांची जीभ घसरली

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. हा पक्ष कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असं देखील दरेकर म्हणाले. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

“गरीबाला, छोट्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं, सत्ता देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष…कारखानदारांचा पक्ष…बँकावाल्यांचा पक्ष…उद्योगपतींचा पक्ष…भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष,” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर १६ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशावरुन दरेकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला असल्याचं बोललं जात आहे.

अन्यायाविरोधात भाजपने कुऱ्हाड हाती घेतलीये

भाजपच्या एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. कुऱ्हाड ही अन्याय अत्याचाराविरोधात उघारली जाते, राज्यात जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल तिथे भाजप हातात कुऱ्हाड घेणार असल्याचं प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलं.

अनिल देशमुख, परमबीर सिंह नेमके आहेत कुठे?

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मात्र ते आता गायब असून हे दोघे नेमके कुठे आहेत? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केला.

- Advertisement -