तेच अशी कृत्य करत पंकजा मुंडेंची प्रगती रोखताहेत – चंद्रकांत पाटील

तेच अशी कृत्य करत पंकजा मुंडेंची प्रगती रोखताहेत – चंद्रकांत पाटील

तेच अशी कृत्य करत पंकजा मुंडेंची प्रगती रोखताहेत - चंद्रकांत पाटील

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पंकजा मुंडेंना डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये आंदोलन केले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला. असे करुन कार्यकर्तेच पंकजा मुंडे यांची प्रगती रोखत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगाबादच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु होते. यावेळी राडा झाला. तर यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले औरंगाबादमधील घटना दुर्देवी आहे. पंकजा मुंडेंची प्रगती त्यांच्यावर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते अशी कृत्ये करुन रोखत आहेत. पक्ष त्या गोष्टीला जास्त इंटरटेन करणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर राडा घालणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. कराड यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालणार असल्याची माहिती भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. यामुळे ते सुद्धा कार्यालयाबाहेर जमा झाले होते. दरम्यान दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले आणि गोंधळ घालणाऱ्यांना चांगलाच चोप देण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेऊन पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत – भागवत कराड

मी काल गोव्यात होतो. मला सांगितले की तुमच्या कार्यालयावर राडा घालणार आहेत. मी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. यानंतर मी हैदराबादला रवाना झालो. हैदराबादमध्ये पोहोचल्यावर समजलं की हाणामारी झाली आहे. मला एकच सांगायचे आहे की, मी जर पोलिसांना सांगतो, त्यानंतरसुद्धा कार्यकर्ते येतात आणि हाणामारी होते. तर पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे असं झालं आहे. त्याच कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला होता. आतासुद्धा पोलिसांना सांगून त्यांनी कारवाई केली नाही. तसेच तो कार्यकर्ता भाजपचा आणि पंकजा मुंडेंचा नाही. तो बाळासाहेब सानप म्हणजे भगवान महासंघाचा पदाधिकारी आहे. त्याने माझ्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा : शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राज्यसभेच्या पराभवाबद्दल आत्मचिंतन

First Published on: June 13, 2022 10:31 AM
Exit mobile version