प्रवीण दरेकरांना सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

प्रवीण दरेकरांना सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

चार दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सरकारी वकील चव्हाणांची १२५ तास रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप वेगवेगळ्या टप्प्यांत देण्यात आली. परंतु विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर अत्यंत तकलादु विषयांवरून मजूर सोसायटीमध्ये डायरेक्टर झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, प्रवीण दरेकरांवर जर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येत असेल तर त्याची मी यादी तयार केली आहे. गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये १०३ जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील. त्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ९० जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आज आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यावर यश मिळवतो, त्यामुळे गृहमंत्र्यांनी देखील टीका केली आहे. तसेच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राऊतांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं केली त्यावर चौकशी करावी. याबाबत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तुमचं सरकार येऊन २७ ते २८ महिने पूर्ण झाले आहे. तरीदेखील तुम्ही रोज धमक्याच देत आहात. नवाब मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये राहून २० दिवस झाले असले तरी देखील तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही आहात. काल हाय कोर्टाने मलिकांचा जामीन नाकारला. जर तुम्हाला त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल आणि जर दाऊदचा दबाव असेल तर त्यांचं खातं तरी काढून घेऊ शकता, असं पाटील म्हणाले.

काहीही न टीकणाऱ्या केसेस प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांवर लावायच्या. मात्र, जी केस कोर्टात आहे. त्याचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल पाटलांनी राज्य सरकारला विचारला आहे.

राज्यपालांचं स्थान हे राज्याच्या कामगिरीमध्ये सर्वोच्च असतं. राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. त्यामुळे त्यांची स्वायत्तता राखावी. राज्यपालांची स्वायतत्ता कायम ठेवण्यासाठी आम्ही आहोत. नवाब मलिकांची याचिका दोन ते वेळा फेटाळ्यानंतरही तुम्ही मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : On This Day: सचिन तेंडुलकरने १०० वे शतक झळकावून रचला इतिहास, तरीही चाहत्यांची तुटली मनं


 

First Published on: March 16, 2022 11:40 AM
Exit mobile version