पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात टाहो मोर्चा

पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात टाहो मोर्चा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने टाहो मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपने मोर्चा काढला आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. २०२१ च्या पुरात ज्या लोकांचं नुकसान भरपाई झालं. त्या पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहीजे, अशी मागणी चंद्रकात पाटलांनी केली आहे.

पहिलं म्हणजे २०२१ च्या पुरातील नुकसान भरपाई…

चंद्रकात पाटलांनी मोर्चादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, २१/६ पुराच्या वेळी खरं म्हणजे १९०० अनुभवातून पूर्वतयारी करायला पाहिजे होती. मात्र, ती होताना काही दिसली नाही. पुन्हा एकदा पूर आला आणि लोकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यावेळची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाहीये. ज्यांना मिळाली त्यांना ती तुटपूंजी मिळाली आहे. आमच्या दोनच मागण्या आज आहेत. पहिलं म्हणजे २०२१ च्या पुरातील नुकसान भरपाई, यामध्ये चिखली गाव मला लगेच आठवलं. कारण १९५ जणांची घरं पडली. मात्र, त्यांना काहीही मिळालं नाही. आज दोन वर्षे राजकारणामुळे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सर्व पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं आणि झालेल्या नुकसानाची भरपाई करून देणं. म्हणजेच दुकानदारांना ५० हजार, घर तुटलं तर ९५ हजार, घर बनवायला ५० हजार आणि रोज ६० रूपये प्रमाणे निर्वाह भत्ता, ७० रूपयाप्रमाणे जनावरांना निर्वाह भत्ता आणि कपडे व भांडी वाहून गेल्यानंतर १५ हजार रूपये म्हणजेच एक मोठी यादी त्यांनी केली आहे.

ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल तर भाजपच्या कार्यालयात नोंद करा

या मोर्चात आम्ही घोषित करतो की, ज्या लोकांचं नुकसान झालं. तसेच ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल तर त्यांनी भाजपच्या कार्यालयात नोंद करा. आम्ही ते घेऊन शासनाकडे पाठपुरावा करतो. मात्र, आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की, यावेळी पूर येऊ नये. अंबाबाईच्या कृपेने पाऊस चांगला आणि समतोल पडावा आणि पीकं चांगली यावीत. त्याचप्रमाणे पूर येऊ नये, अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. परंतु पूर आला तर त्यांची पुर्व तयारी काहीच करण्यात आलेली नाहीये. धरणांमधल्या पाण्याचं नियोजन नाहीये. हायवे पावसामुळे पूर आल्यानंतर हायवे पंधरा-पंधरा दिवस बंद होतो. अत्यावश्यक गोष्टी सुद्धा अकडून पडतात. त्यासाठी पाच कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मात्र, ते खर्च करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणतात की, नियोजनाला पैसे पुरेसे नाहीयेत. पैसे पुरेसे असते तर हायवे वरची पुरस्थिती बदलण्यात आली असती. खड्ड्यांमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर लोकांना तुम्ही कोठे शिफ्ट करणार आहात, असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे.

आज तुम्हाला टाहो फोडण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, सगळ्याच विषयांवर टाहो फोडण्याची वेळ आली आहे. २१ च्या पुराचे पैसे अजून मिळणार नसतील तर कर्जमाफी घोषित केल्यानंतर नियमीतपणे कर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अजून मिळणार नसतील.


हेही वाचा : “…तुमच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालणार नाही”; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर


 

First Published on: June 1, 2022 12:17 PM
Exit mobile version