चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वादग्रस्त शुभेच्छा बॅनरच्या जागी आता माफीनामा;पण वाद शमेना

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वादग्रस्त शुभेच्छा बॅनरच्या जागी आता माफीनामा;पण वाद शमेना

नागपूर जिल्ह्यातील एका वादग्रस्त बॅनरमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादात सापडले. या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा फोटो ठेवण्यात आला होता. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका देखील करण्यात आली. त्यानंतर आता या वादग्रस्त शुभेच्छा बॅनर ऐवजी आता माफीनामाच झळकवण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील कोराड परिसरातील बाजार चौकात हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक शुभेच्छा फलक झळकवण्यात आले. या फलकावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे छायाचित्र असल्याने वाद निर्माण झाला. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या बॅनरचा फोटो शेअर केला. यासोबत काही सवाल देखील त्यांनी उपस्थित केले. ‘हा काय घाणेरडा प्रकार आहे’, असं विचारत आव्हाडांनी आपला संताप व्यक्त केला.

हे ही वाचा: राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह आता बॅकफूटवर! म्हणाले, “अयोध्येत आले तर…”

हे ही वाचा: धक्कादायक! समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

राजकीय वर्तुळात होत टीकेनंतर अखेर हा वादग्रस्त फलक काढण्यात आला. या वादग्रस्त फलकाच्या जागी आता थेट माफीनामा लिहिलेला दुसरा बॅनर झळकवण्यात आला. या माफीनाम्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. नरेश जामदार, मनज सावजी, मेघराज बेलेकर, लक्ष्मण बेलेकर आणि शाहू जामदार यांची नावे या माफीनाम्यावर लिहिण्यात आली आहेत.

हे ही वाचा: काय हा फडतूसपणा? ‘तो’ फोटो शेअर करत, अंबादास दानवेंचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल

या बॅनरमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यांची माफी मागतो, असा फोटो लावणे मान्य नाही. ती कार्यकर्त्यांची चूक आहे. ते बॅनर तातडीने काढण्यात आले. संबंधित कार्यकर्त्यांनी माफीनामाही लिहून दिला आहे. मात्र, हा प्रकार माफी योग्य नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. त्या कार्यकर्त्याला पक्षातून काढणार असून कारवाई करणार, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे.

First Published on: April 10, 2023 12:51 PM
Exit mobile version