घरदेश-विदेशधक्कादायक! समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

धक्कादायक! समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

Subscribe

धक्कादायक! कन्याकुमारी जिल्ह्यात समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना
नवी दिल्ली : कन्याकुमारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रविवारी (9 एप्रिल) रात्री काही अज्ञात व्यक्तींनी कन्याकुमारी जिल्ह्यातील कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी नागरिक करत असून ते यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर कन्याकुमारी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. एसपी हरी किरण प्रसाद यांनी सांगितले की, पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे की नाही हे माहीत नाही. परंतु मूर्तीचे थोड नुकसान झाले आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून मूर्चींच्या तोडफोड प्रकरणी चौकशी करण्यासाठी एका टीमची नेमणूक करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -