करोना व्हायरस : रेल्वे स्थानकावरही बाहेरुन येणार्‍या प्रवाशांची तपासणी करा

करोना व्हायरस : रेल्वे स्थानकावरही बाहेरुन येणार्‍या प्रवाशांची तपासणी करा

कोरोना कालावधीत १७ वर्षीय मुलीचा उत्तरप्रदेश ते ठाणे रेल्वे प्रवास; रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न स्वप्नच

परदेशातील करोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या दिल्लीत ३०० टक्क्यांनी वाढल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने आतापर्यंत हवाई प्रवाशांची तपासणी होत असली तरी यापुढे रेल्वे प्रवाशांचीही तपासणी करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील अनेक प्रवासी रेल्वेने मुंबईत येत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकावरील तपासणी करण्याचे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबईत करोना व्हायरसच्या भीतीचे सावट पसरल्याने भाजपच्या नगरसेवकांनी तोंडाला मास्क लावून स्थायी समितीसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या सदस्यांनी चर्चेची मागणी करत यावर प्रशासनाने माहिती देण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी यावर प्रशासनाने निवेदन करून येवू घातलेल्या आजारांबाबत प्रशासन किती सतर्क आहे याची माहिती द्यावी, असे सांगितले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी समितीला याबाबतच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली आहे.

नागरिक विमानानेच नाहीतर रेल्वेनेही करतात प्रवास

यावर बोलताना सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी याबाबत कशाप्रकारे प्रशासन जनजागृती करत आहे,अशी विचारणा करत सुट्टीच्या दिवसांमध्ये लोक सहलीला निघणार आहे, त्यासाठी टॅव्हल्स एजन्सी कामाला लागले आहे. यावर प्रशासनाचे काय नियंत्रण आहे, असा सवाल केला. तसेच दिल्लीत जर ३०० टक्के रुग्णांची संख्या वाढली असेल तर दिल्लीतील नागरिक केवळ विमानानेच प्रवास करत नाही तर रेल्वेनेही करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरही अशाप्रकारची सुविधा पुरवली जावी, अशी सूचना केली. भाजपच्या ज्योती अळवणी यांनी या व्हायरसचा संसर्ग १४ दिवस असतो. तर जे रुग्ण कस्तुरबात दाखल झाले आहे, त्यांना १४ दिवस का ठेवले नाही? असा सवाल केला. तर भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांनी मुंबईत लोंढा दररोज येतो. त्यामुळे भविष्यात केवळ ४ रुग्णालयांमध्येच आयसोलेशन वॉर्ड तयार न करता १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये तसेच कामा आल्बेस, सेंट जॉर्जेस रुग्णालयातही असे वॉर्ड तयार केले जावेत, अशी सूचना केली. तर भाजपचे अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांनी दिल्लीत जर ३०० टक्के रुग्ण वाढले आहे. तर मग त्यांना क्वारंटाईनमध्ये का ठेवले नाही? असा सवाल करत एन ९५ मास्कचा तुटवडा ऑनलाईन खरेदीवरही होऊ लागला, मग आपण कुठून घेणार असा सवाल त्यांनी केला.


हेही वाचा – करोना व्हायरस : मुंबईत १२ जणांवर उपचार सुरू


 

First Published on: March 5, 2020 10:25 PM
Exit mobile version