खंबाटकी घाटामध्ये केमिकल टँकर उलटला

खंबाटकी घाटामध्ये केमिकल टँकर उलटला

अपघात

सातारा येथील खंबाटकी घाटामध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली आहे. खंबाटकी घाटामध्ये केमिकल टँकर उलटला असून हा अपघात झाला आहे. या टँकरमध्ये केमिकल असल्याचे समोर आले आहे. केमिकल असल्यामुळे हा टँकर उलटल्याने या संपूर्ण परिसरात केमिकल पसरल्याने काही वेळ या ठिकाणाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत वाहतुकीचा दुसरा मार्ग खुला केला आहे.

वाहतूक पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न

खंबाटकी घाटामध्ये आज अचानक केमिकल टँकर उलटल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. या टँकरमधील केमिकल संपूर्ण परिसरात पसरल्याने या मार्गाची वाहतूक १ तास बंद करण्यात आली होती. मात्र आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे समोर आले आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

First Published on: February 7, 2019 10:15 AM
Exit mobile version