कोंबडीवरून विधानसभेत राडा, भुजबळ आणि मनीषा चौधरी भिडले आमने-सामने

कोंबडीवरून विधानसभेत राडा, भुजबळ आणि मनीषा चौधरी भिडले आमने-सामने

मुंबई महापालिकेच्या विकासासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, असा वाक्यप्रचार त्यांनी केला. परंतु दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी म्हटलं की, मुंबईला कोंबडी म्हटलं म्हणजे हा मुंबईकरांचा अपमान आहे. यावर मनिषा चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर छगन भुजबळ आणि मनिषा चौधरी हे दोघेही आमनेसामने भिडले.

हवा रिफायनरी प्रकल्पामुळे जास्त खराब होत आहे की, बिल्डींगच्या कामामुळे खराब होतेय, यामध्ये नेमकी अडचण काय आहे. मुंबई ही सोन्याची अंडं देणारी कोंबडी आहे, असं म्हणत असत. ही हवा प्रदूषित होण्याचं नेमकं कारण काय?, हे शोधून काढलं पाहीजे. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे. कारण मुंबई महापालिकेत मी दोन वेळा महापौर होतो. तुम्ही मला काही सांगू नका. हा एक वाक्प्रचार आहे. असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनिषा चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला.

हा एक वाक्प्रचार असून तो मराठी साहित्यात वापरला जातो. यात कुठलेही असंसदीय शब्द नाहीत, यावरून महिलांचा अपमान झाल्याचंही काही कारण नाही, असं छगन भुजबळ यांनी सभागृहाच्या बाहेर म्हटले आहे. महिला सदस्यांचा या वक्तव्यावरून अपमान झाला असेल तर मी दिलगिरीही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईला कोंबडी म्हणत असतील तर हा मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तुम्हाला मुंबईबद्दल प्रेम नाहीये हे दिसतंय. तुम्ही अडीच वर्षात काय केलं?, हे संपूर्ण दिसतंय. २५ वर्षे तुम्ही मुंबई लुटली. तुम्हाला अभिमान असायला पाहीजे. ज्या मुंबईमध्ये जी-२०साठी १९ देशांचे लोकप्रतिनिधी येत आहेत. त्या मुंबईला कोंबडी हा शब्द वापरत आहेत. हा मुंबईकरांचा अपमान आहे. त्यांनी माफी मागावी, असं मनिषा चौधरी म्हणाल्या.


हेही वाचा :  पुण्यात कुत्र्यांच्या भांडणावरून मालकच आपसात भिडले, पट्ट्यांनी केली हाणामारी


 

First Published on: December 21, 2022 5:00 PM
Exit mobile version