घरताज्या घडामोडीपुण्यात कुत्र्यांच्या भांडणावरून मालकच आपसात भिडले, पट्ट्यांनी केली हाणामारी

पुण्यात कुत्र्यांच्या भांडणावरून मालकच आपसात भिडले, पट्ट्यांनी केली हाणामारी

Subscribe

पुण्यातून पाळीव प्राण्यांबाबात धक्कादायक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मांजराच्या ऑपरेशनवरून हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली. त्यानंतर कुत्र्यांच्या भांडणावरून मालकच आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात घडली आहे. दोन कुत्र्यांचे भांडण सोडवताना त्यांना फिरायला आणणारे तरुण एकमेकांना भिडले. त्यानंतर पट्ट्याने हाणामारी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात प्रतीक संतोष मदने आणि ओंकार संदीप बोत्रे आपल्या श्वानांना फिरायला घेऊन आले होते. त्यावेळी दोन्ही श्वानांमध्ये भांडण सुरू झाले. त्यावेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मात्र, ओंकारने मी श्वानांच्या भांडणात पडणार नाही असं सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर प्रतीकला ओंकारचा राग आला आणि त्याने संतापाच्या भरात श्वानाच्या चामड्याच्या पट्ट्याने ओंकारवर हल्ला केला. दरम्यान, या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ओंकार गंभीर जखमी झाला आहे. त्यात ओंकारच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर ओंकारने प्रतीकच्या विरोधात फिर्याद दाखल केली. यासंबंधी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कही दिवसांपूर्वी आजारी मांजरीवर पशु दवाखान्यात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आणि रागाच्या भरात मांजर प्रेमीने पशु डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसरमध्ये शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी रविवारी हडपसर पोलीस ठाण्यात मांजर प्रेमी महिलेसह चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मविआ आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -