sharad pawar turns 81 : शरद पवारांनी आरक्षण घालवलं नाही तर आणलं – छगन भुजबळ

sharad pawar turns 81 : शरद पवारांनी आरक्षण घालवलं नाही तर आणलं – छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले की, मला कोणीही स्क्रिप्ट लिहून देऊ शकत नाही, हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे.

ओबीसीचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण दिलं कोणी?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सांगितलं की, महात्मा फुले समता परिषदेची जालनाला मोठी रॅली काढण्यात आली. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तेव्हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर शरद पवारांनी एक महिन्यामध्ये मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली. त्यानंतर त्यांनी शिक्षणात, नोकरीत आणि राजकीय आरक्षण सुद्धा मागासवर्गीय आयोगाला दिलं. दरम्यान, काही लोकं म्हणत होते की, शरद पवार यांच्यामुळे आरक्षण गेलं. त्यांच्यामुळे आरक्षण गेलं नाही तर त्यांनी आणलं. असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नेहरू सेंटर मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. काही लोकं म्हणत होते की, शरद पवार यांच्यामुळे आरक्षण गेलं. त्यांच्यामुळे आरक्षण गेलं नाही तर त्यांनी आणलं. त्यावेळी तुम्ही विरोध करत होतात. पवारांनी आरक्षण आजही आणलं असून तुम्ही परत तेच करत आहात. असं छगन भुजबळ म्हणाले.

 आरक्षण संपवण्याचं काम हे भाजप नेते करत आहेत

पुढे भुजबळ म्हणाले की, भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यांनी अध्यादेश काढलं आणि सुप्रीम कोर्टात अध्यादेशाला भाजपचे जनरल सेक्रेटरी विरोध करत आहेत. जे राजकीयदृष्या शक्य नाही ते कोर्ट कचेरीच्या सहाय्याने आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न अपद्यापही हे भाजप नेते करत आहेत. देशातील संपूर्ण आरक्षण संपवण्याचं काम हे भाजप नेते करत आहेत. त्यासाठी ओबीसीने जागृत झालं पाहीजे आणि हक्काचं रक्षण केलंच पाहीजे.

शरद पवार यांना समजून घेण्यासाठी त्यांची दोन पुस्तकं प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचली पाहीजे. लोक माझा सांगती आणि नेमकेचि बोलावे अशी दोन पुस्तके प्रत्येकाने वाचली पाहीजेत. म्हणजे कसं बोलावं, कसं चालावं आणि निर्णय कसे घ्यायचे. तसेच कोणत्या विषयावर आपण बोलू शकतो. हे समजण्यासाठी ही दोन पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया पुढे पाऊलं टाकू शकतो. असं भुजबळ म्हणाले.

पुण्याच्या सभेमध्ये आम्ही मागणी केली होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला द्यायला पाहीजे. त्यांनतर शरद पवार यांनी एक महिन्याच्या आत निर्णय घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं.

… चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत झाला पाहीजे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ८१ व्या वयामध्ये असताना सुद्दा तरूणांना लाजवेल असं काम करत आहेत. देशालासोबत घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. किंबहुना देशातील मोठमोठे नेते आणि विरोधी पक्षातील नेते शरद पवार यांच्याकडे आशेने पाहत आहेत. तुम्ही जो चमत्कार महाराष्ट्रात घडवला. तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत झाला पाहीजे. कोणीही त्यांना कमी लेखू नका. असं भुजबळ म्हणाले.


हेही वाचा : sharad pawar turns 81 : आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे


 

First Published on: December 12, 2021 1:52 PM
Exit mobile version