घरताज्या घडामोडीsharad pawar turns 81 : आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत...

sharad pawar turns 81 : आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे

Subscribe

तत्त्वांसाठी कितीही किंमत चुकवावी लागली आणि तरी तत्वांशी तडजोड न करता मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर. म्हणजेच मराठवा़डा विद्यापीठाचा जो नाम विस्ताराचा निर्णय जो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. केवळ एवढाचं निर्णय नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे केवळ तीन दलीतांचे कैवारी म्हणून नाही. तर जागतिक पातळीवरचे अर्थतज्ज्ञ जेव्हा शरद पवार पाहतात. तेव्हा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वारसदार ठरतात. असे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे असे म्हणाले.

आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. ते म्हणाले की, आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत नाही. तर आमच्या नेत्याच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असते. आमच्या नेत्याला हजारो आणि लाखो रूपयांचे तैवानी मशरूम खावे लागत नाहीत. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तरूणाच्या प्रश्नाला भिडताना आमचा नेता दिवसागणिक अधिकच तरूण होत जात आहे. शरद पवार यांच्या खिश्याला लाखोंचा पेन लागत नाही. तर साधा पायलट पेन असतो पण त्या पायलटच्या पेनने सत्तर हजार कोटी रूपयांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्वाक्षरी होते. येथे मला वाटतं की आमचा नेता हा वेगळाच आहे.

- Advertisement -

अर्जुन का सारथी ही महत्त्वाची आणि काळाजी गरज

‘हर अर्जुन का सारथी’ आज काळाची गरज आहे. कारण बिहारच्या निवडणुकीची रणधुमाळी होते. तेव्हा ती रणधुमाळी गाजवणारे तेजस्वी यादव सुद्धा आवर्जुन शरद पवार यांना भेटायला येतात आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणुकीच्या आधी पवारांच्या पत्राची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हर अर्जुन का सारथी ही महत्त्वाची आणि काळाजी गरज आहे. देशात कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती निर्माण झालीये. देशाची परिस्थिती ज्याप्रमाणे निर्माण झालीये. तेव्हा तुमच्या-आमच्या सारख्या तरूणाईला आज विचार करण्याची गरज आहे. २५ ते ३० वर्षांनंतरचा देश आणि महाराष्ट्र आपल्याला कसा हवाय. त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत की या लढाईसाठी मार्गदर्शन करणारा सेनापती शरद पवार यांच्या रूपाने खंबीरपणे आपल्या सोबत आहे.

देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज

जेव्हा भूजच्या भूकंपामध्ये जेव्हा शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. तसेच भूकंप आज देशाला बसत आहेत. सांप्रदायिकतेच्या भूकंपाचे हादरे बसत आहेत. देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते. तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही. असा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. असं अमोल कोल्हे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : गोपीनाथ मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना त्यांनाच कळली – संजय राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -