मंत्री भुमरेंविरोधात तक्रार करणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ला? पोलिसात गुन्हा दाखल

मंत्री भुमरेंविरोधात तक्रार करणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ला? पोलिसात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर  : शिंदे गटाचे नेते, मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar)  संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी भाऊसाहेब वाघ (Bhausaheb Vagh) या तरुणाला गेल्या आठवड्यात फोनवरून शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होती. यानंतर या तरुणाने भुवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र आता नवीन माहिती समोर येत आहे. संबंधित तरुणाने त्याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. (Attack on the house of a youth who complained against Minister Sandipan Bhumre A case has been filed with the police)

अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

भाऊसाहेब वाघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 25 जूनला रात्री काही लोक काळ्या गाडीतून माझ्या घरासमोर येऊन थांबले आणि त्यांनी माझा घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यावर अज्ञात लोकांना पाहून मी तात्काळ 112 नंबरला फोन लावला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले. दरम्यान वाघ यांच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसात या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस

काय आहे प्रकरण? 

संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावात भाऊसाहेब वाघ नावाचा तरुण राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो छत्रपती संभाजीनगर शहरात राहण्यासाठी आला आहे. दरकवाडी गावात रस्त्याचे काम सुरु झाले, पण रस्ता न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप भाऊसाहेब वाघ या तरुणाने केला आहे. या रस्त्याचे काम मंत्री संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे करत असल्याचे भाऊसाहेबला गावातील लोकांनी सांगितल्याने. त्यानंतर भाऊसाहेब याने भुमरे यांच्या मालपाणी नावाच्या पीएला फोन करुन कामाबद्दल विचारणा केली. याचाच राग आल्याने भुमरे यांनी आपल्याला फोनवरुन शिवीगाळ केली, तसेच तुझ्या घरी येतो, अशी धमकी दिल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. यानंतर तरुण प्रचंड दहशतीत असून भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा – Instagramचा नाद, रिल्स फॉलो केल्यामुळे तरुणाला लाखोंचा गंडा; पूजा भोईरकडून पुन्हा फसवणूक

धमकी प्रकरणी अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

या सर्व प्रकरणावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, कार्यकर्ते फोन करत असतात, रागवत असतात. त्यामुळे काम करत असताना आपण थोडं संयम बाळगला पाहिजे. कोणीतरी आरोप केले म्हणून लगेच आपण उत्तर द्यावे, शिवीगाळ करावे हे चुकीचे असल्याचे दानवे म्हणाले.

First Published on: June 26, 2023 12:53 PM
Exit mobile version