घरमहाराष्ट्रMaharashtra Rain : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस

Maharashtra Rain : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस

Subscribe

Maharashtra Rain : मुंबई : उशिराने दाखल झालेल्या आणि पोषक वातावरणाअभावी रेंगाळलेल्या मोसमी वाऱ्यांनी वेगाने प्रगती केल्यामुळे मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. (Maharashtra Rain Heavy rain in Mumbai Madhya Maharashtra and Konkan for the next two days)

सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज मुंबई, पुणे शहरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यात मान्सूनची गती वाढणार असल्यामुळे या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पूर्व विदर्भात भंडारा, नागपूर, गोंदिया परिसरातसुध्दा उद्या अतिमुसळधार पाऊस होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी नेत्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाले…

पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढल्यामुळे पुढील दोन दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 27 जून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. याशिवाय, 28 जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे, तर रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पोहोचले पंढरपुरात, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं

मुंबई आणि दिल्लीमध्ये तब्बल ६२ वर्षांनी मान्सून एकत्र दाखल

उशिरा दाखल झालेला मान्सून आता चांगलाच सक्रीय झाला आहे. अवघ्या 24 तासांमध्ये मान्सूनने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागांमध्येही मान्सून रविवारी दाखल झाला. विशेष म्हणजे मुंबई आणि दिल्लीमध्ये तब्बल 62 वर्षांनी मान्सून एकत्र दाखल झाला आहे. मुंबईमध्ये दोन आठवडे उशिराने, तर दिल्लीमध्ये दोन दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -