मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सर्व सचिवांना दुपारी १२.३० वाजता ऑनलाईनच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या बैठकीत ते सर्व सचिवांचे आभार माननार आहेत. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त सचिव आणि प्रधान सचिव हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, कार्यालयीन कामकाजासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत जर सर्व सचिवांचे आभार मानले तर ठाकरे राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण ठाकरेंनी कालपासून त्यांच्या एक्झिटच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरूवात केली आहे. जनतेला संबोधित करताना मी पद देखील सोडायला तयार आहे. याची पहिली तयारी म्हणून मी माझं शासकीय निवासस्थान सोडतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं आणि ते खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे रहायला आले.

उद्धव ठाकरे हे आमदारांना देखील संबोधित करताना बोलले होते की, मी या ठिकाणाहून निघून जात आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला इतरांसोबत निघून जायचं आहे, त्यांनी खुशाल निघून जावं. त्याप्रमाणे आज शिवसेनेचे सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात म्हणजेच गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांचा समावेश आहेत. तर आतापर्यंत आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि दीपक केसरकर हे तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या गोटात सेनेचे किती मंत्री, तर ठाकरेंकडे किती उरले मंत्री?


 

First Published on: June 23, 2022 11:38 AM
Exit mobile version