मुख्यमंत्री कामगार की विद्यार्थी? Work From Home चा निर्णय त्यांच्यासाठी कसा? शिवसेनेचा ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री कामगार की विद्यार्थी? Work From Home चा निर्णय त्यांच्यासाठी कसा? शिवसेनेचा ठाकरेंवर घणाघात

Sanjay Shirsat attack on Uddhav Thackeray and Sanjay Raut

वर्क फ्रॉम होमचा निर्णय हा कर्मचारी, कामगारांसाठी तसचं विद्यार्थ्यांसाठी होता. तो मुख्यमंत्र्यांसाठी नव्हता, असं म्हणत शिवसेनेचे ( शिंदे गटाचे) नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. इतर पक्षांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची संजय राऊतांना सवयच आहे, असा घणाघात शिरसाट यांनी केला आहे.(  Chief minister workers or students How is the decision of Work From Home for them Shiv Sena leader Sanjay Shirsat attack on Uddhav Thackeray and Sanjay Raut )

राष्ट्रवादीचा एक गट जो अजित पवारांसोबत आहे तो भाजपात जाणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, इतर पक्षाच्या कामात हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे त्यांनी अनेकदा शिव्यादेखील खाल्या आहेत. संबंधित पक्षांच्या नेत्यांची बोलणीही ऐकली आहेत. तरी सुद्धा राऊत सुधरायचं नाव घेत नसल्याचं शिरसाट म्हणाले. राऊतांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा. परंतु वाकून पाहण्याची राऊतांची सवय ही त्यांना जडलेली आहे. हा एक रोग राऊतांना आहे.

शरद पवार, राष्ट्रवादी पक्षात जे काही सुरु आहे ते पाहतील ना, पण राऊत यात का उगाच पडतात? पवारांनी जे मंत्रालयात बसण्यावरुन ठाकरेंना टोचलं होतं त्यावरही राऊत बालिशपणा दाखवतं उत्तर देतात. शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसायला हवं. त्यावर राऊत म्हणतात की केंद्राकडून नोटीफिकेशन निघालं होतं की, सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं. पण केंद्राने काढलेला हा आदेश विद्यार्थी, कर्मचारी आणि कामगारांसाठी होता. मुख्यमंत्र्यांसाठी नाही. मुख्यमंत्री काय कामगार होते का?, असं म्हणत शिरसाट यांनी घणाघात केला आहे.

( हेही वाचा: शरद पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले : रामदास कदम )

महाविकास आघाडीचं हे शेवटच टोक

शरद पवारांनी लिहिलेल्या पुस्तकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात बसायला हवं होतं असं म्हटलं आहे. यावर राऊतांनी दिलेलं उत्तर अगदी बालिश आहे आणि यावर ते सामनाच्या अग्रलेखातून जो दुसऱ्या दिवशी लहान मुलाच्या कामी येतो त्यात सडेतोड उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं हे शेवटचं टोक आहे, असं शिरसाट म्हणाले.

First Published on: May 4, 2023 5:04 PM
Exit mobile version