मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, गोविंदा आरक्षणावरून अजित पवारांचा सल्ला

मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, गोविंदा आरक्षणावरून अजित पवारांचा सल्ला

सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक निर्णयांचा धडका लागला आहे. त्यातच, गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षणाची तरतूद करणार असल्याची घोषणा एकनात शिंदे यांनी जाहीर केली. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेताना क्रिडा विभागाशी चर्चा केली नाही. भावनेच्या भरात निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊ निर्णय जाहीर केल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. (Chief Ministers should not take emotional decisions, Ajit Pawar’s advice on Govinda reservation)

हेही वाचा -जळगावात तणाव : दौरा सुरू होण्यापूर्वीच फाडले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर

“उद्या दहीहंडी आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडणे आश्चर्यकारक आहे. सोमवारी (22 ऑगस्ट) मी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. गोविंदांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न केले नाही. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? मुख्यमंत्री ज्या ठाण्याचं प्रतिनिधित्त्व करतात, तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचं नाही, पण उद्या गोविंदांना आरक्षण देऊन नोकरी देणार, मात्र जी मुलं-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. तिथे देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे. एकवेळ मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही. क्रीडा विभाग किंवा कोणाशी बोलले नाही. सर्वांशी बोलण्याची गरज असते, अशा शब्दात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांवर नाहीच, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत निंबाळकर म्हणाले…

अमरावती येथील पूरग्रस्त भागात अजित पवार आज पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे विदर्भात शेतीचं नुकसान झालं आहे, या नुकसानीची पाहणी करून याबाबत अधिवेशनात बोलणार असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, आज मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल विभागाला धमकीचे पत्र आले आहेत. अशा धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजेत, असं अजित पवार म्हणाले. अनिल अंबानींच्या कुटुंबाला धमकी आली होती. बऱ्याचदा माथेफिरु असे उद्योग करतात. तरीही अशा धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजे.” ‘राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा सक्षम आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी,” असा सल्लाही अजित पवारांनी दिला.

First Published on: August 20, 2022 12:41 PM
Exit mobile version