चेहेडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

चेहेडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

Child injured in leopard attack in Chehedi

नाशिकरोड येथील चेहेडी परिसरात शनिवारी (दि.४) रात्री सातच्या सुमारास बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करताच सुदैवाने आजोबांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला वीट फेकून मारल्याने बिबट्या दूर पळाला अन् चिमुकल्याचा जीव वाचला. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. जखमी मुलास बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

जाखोरी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद केला असला तरी इतर अनेक बिबटे दारणाकाठच्या गावांमध्ये आढळून येत असल्याने व वारंवार हल्ले करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत कायम आहे. शनिवारी रात्री सातच्या सुमारास सातपुते मळ्यात बिबट्याने आयुष जयंत सातपुते (८) हा सातपुते मळ्यातील घराच्या बाहेर आजोबा नेताजी काशिनाथ सातपूते यांच्या बरोबर त्यांच्या घरातून बाहेर निघून शेजारच्या घरात जात असतांना बिबट्याने हल्ला केल्याचे पहाताच आजोबा नेताजी यांनी प्रसंगावधान राखत जवळच पडलेली वीट उचलून बिबट्याला फेकून मारल्याने बिबट्याचा हल्ला परतावून लावला. आजोबांमुळे आयुषचा जीव वाचल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी बिबट्याची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जखमी आयुषला येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नगरसेवक पंडीत आवारे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
First Published on: July 4, 2020 8:58 PM
Exit mobile version