‘पूजा आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

‘पूजा आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

बीड जिल्ह्यातील तरुणी पूजा चव्हाण हिने ८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर राजकारणात एकच चर्चा रंगू लागली. या आत्महत्या प्रकरणी सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या आत्महत्येप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

ज्या तरुणीच्या आत्महत्येने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे, ती पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाला ५ बहिणी आहेत. त्यापैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. पुण्यात ती भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्यासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत होती. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास आणि अरुण यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

पूजा मूळची परळी वैजनाथ येथील होती. ती टीक टॉक स्टारही होती. पण काही दिवसांपूर्वी ती पुण्यात इंग्लीश स्पीकींगचा कोर्स करण्यासाठी आली होती. येथील वानवडीमधील हेवन पार्क सोसायटीत ती भाऊ व मित्राबरोबर राहत होती. ८ फेब्रुवारीला तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून त्याची नोंद केली. पण, आता विदर्भातील एका मंत्र्याचा पूजाबरोबर संबंध असल्याचे समोर आले आहे. पूजाबद्दल एका कर्मचाऱ्याशी बोलतानाची या मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात पूजा आत्मह्त्येचे विचार करत असल्याचं हा कर्मचारी संबंधित मंत्र्याला सांगत आहे. यावर मंत्री तिच्याकडून मोबाईल घेण्याबरोबरच तिची समजूत काढण्यासही तिला सांगत आहे.


हेही वाचा – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओची सखोल चौकशी करा – फडणवीस


First Published on: February 12, 2021 10:55 PM
Exit mobile version