पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

देशात पेगॅसस प्रकरणावरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र अससेल्या सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी पेगॅससची चिंता सोडून पेंग्विनची चिंता करावी असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. केंद्रातील पॅगॅसस प्रकरणावरुन राज्यातही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत अप्रत्यक्ष अदित्य ठाकरे यांच्यावर भाष्य केलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत यांना पेगॅसस प्रकरणावर चिंता सोडून पेंग्विनची चिंता करण्याचा सल्ला दिला आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, “संजय राऊतजी पेगॅससची चिंता सोडा पेंग्विनची चिंता करा, आज ज्या युवराजांच्या प्रिय ठेकेदारामुळं’डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला का आणि कोणासाठी?” असा सवालही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना केला आहे.

पेगॅसस प्रकरणावर संजय राऊतांचा घणाघात

पेगॅसस प्रकरणामधील खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. पॅगेसस प्रकरण केंद्र सरकारला गंभीर वाटत नाही हे रहस्यमय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विरोधकांना या प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात यावी आणि या समितीमार्फत तपास करावा अशी मागणी विरोधकांनी संसदेत केली आहे. संसदेत विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री,खासदार, सर्वोच्च न्यायालय, लष्कराचे अधिकारी आणि पत्रकार यांचं संभाषण चोरुन ऐकले जात असून सुद्धा केंद्र सरकारला काही वाटत नाही हे जरा रहस्यमय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 29, 2021 2:41 PM
Exit mobile version