CIDCO Lottery : नवीन वर्षात सिडको ५००० घरांसाठी काढणार लॉटरी

CIDCO Lottery : नवीन वर्षात सिडको ५००० घरांसाठी काढणार लॉटरी

घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण नवी मुंबईत सिडकोच्या वतीने तब्बल पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नवी मुंबईमध्ये तळोजा, द्रोणागिरी आणि कळंबोली अशा ठिकाणी ही घरे असणार आहे.

पाच हजार घरांची नवी मुंबईमध्ये सिडकोच्यावतीने महागृहनिर्माण योजना आहे. या घरांच्या लॉटरी प्रक्रियेला आगामी महिन्यातपासून म्हणजेच २०२२ पासून सुरूवात होणार आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या घरकुल योजनअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथे घरे उपलब्ध होणार आहेत.

नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्याकरिता सिडकोतर्फे जानेवारी २०२२ मध्ये ५ हजार घरांच्या ‘महागृहनिर्माण’ योजनेची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे येणाऱ्या नवीन वर्षात अनेक कुटुंबांचे आपल्या स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल,असा मला विश्वास वाटतो. असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे म्हडा आणि सिडकोकडून घरांसाठी सोडत काढण्यात आली नव्हती. परंतु नवीन घरांच्या सोडतीसाठी म्हाडाने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. तर कोरोना महामारीनंतर लॉटरी निघत असल्यामुळे घराचं स्वप्न असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा : OBC Reservation : इम्पेरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं – पंकजा मुंडे


 

First Published on: December 15, 2021 4:00 PM
Exit mobile version