राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री

राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत पण त्यांची राजकीय वक्तव्यं आणि व्यंगचित्रं गांभीर्याने घ्यायची गरज नाही’, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत, पप्पू आता परमपूज्य झाला असं म्हटलं होतं. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी काहीशा खोचक पद्धतीने उत्तर दिलं आहे. आजवर भाजपाचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होते. मात्र, राहुल गांधींना आता राज ठाकरे परमपूज्य म्हणत आहेत. याच टीकेला मुख्यंमंत्री फडणवीसांनी खणखणीत उत्तर देत, राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राज ठाकरेंकडे आपली मतं मांडण्याशिवाय काहीही काम नाही, त्यामुळे त्यांना कुणी गांभीर्याने घेऊ नका असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.


वाचा: अनैतिक संबंधाची पोलखोल; मित्रानेच केला मित्राचा खून

राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधतेवेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेत असतात आणि व्यंगचित्रातूनही व्यक्त होत असतात, हे आपल्याला ठाऊकच आहे. राज ठाकरे जे काही बोलतात ते त्यांचं वैयक्तिक मत असतं. त्यामुळे त्याकडे फारसं लक्ष देण्याची आणि त्याला गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नाही.’ तर दुसरीकडे ३ राज्यांतील भाजपच्या पराभवाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की,  हा पराभव आहे असं आम्हाला वाटत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये अगदी थोड्या फरकाने काँग्रेस जिंकले आहेत. मात्र, छत्तीसगढमध्ये आमची सपशेल हार झाल्याचं आम्ही मान्य करतो. आम्ही त्यावर जरूर आत्मपरीक्षण आणि चिंतन करु, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

First Published on: December 13, 2018 6:04 PM
Exit mobile version