अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत – मुख्यमंत्री

अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता असं ऐकलं होतं. परंतु, राष्ट्रवादीला दोन उमेदवार सापडत नाहीत. अजित पवार यांच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे कोणीही त्यांची घड्याळं हातात घ्यायला तयार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सभा रद्द झाल्यावरून राज ठाकरे यांच्यावर ही निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी अस ऐकलं होतं की, राष्ट्रवादी हा पिंपरी-चिंचवड शहराचा बालेकिल्ला आहे. परंतु, आता बाले किल्ल्याची अवस्था अशी झाली की दोन उमेदवार ही सापडत नाहीत. मी एका पत्रकाराला विचारलं काय कारण आहे, राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नाही, तेव्हा पत्रकार म्हणाला. मी देखील अजित पवार यांना विचारलं की पिंपरी-चिंचवड शहर तुमचं आवडत येथील तुम्ही नेते होतात. मात्र आता इथे उमेदवार सापडत नाहीत. तेव्हा अजित पवार म्हणाले काय करायचं पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. त्यामुळं आमचं घड्याळ घ्यायलाच तयार नाहीत. त्यामुळे आमच्यासोबत कोणीच राहायला तयार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर केली.

मनसेचे राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली यावर निशाणा साधत कालच्या सारखी येथील सभा रद्द होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आमचे आमदार लक्ष्मण जगताप हुशार आहेत. त्यांनी अगोदरच पावसाचा अंदाज घेऊन कार्यालयात सभा ठेवली. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ने आपला पराभव अगोदरच स्वीकारला आहे. त्यांच्या जाहीर नाम्यात जगातील जेवढी आश्वासने आहेत तेवढी दिली आहेत. पण, एकच आश्वासन द्यायचं विसरले. आम्ही पुन्हा जर निवडून आलोत तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ताजमहाल बांधून देऊ हे आश्वासन द्यायला विसरले, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा –

‘आरे’प्रकरणी आदित्य ठाकरेंचा भाजपासह सरकारवर निशाणा

First Published on: October 11, 2019 11:16 AM
Exit mobile version