घरमुंबई'आरे'प्रकरणी आदित्य ठाकरेंचा भाजपासह सरकारवर निशाणा

‘आरे’प्रकरणी आदित्य ठाकरेंचा भाजपासह सरकारवर निशाणा

Subscribe

'आरे कोण रे?' असे प्रश्न निवडणुक प्रचारात उपस्थित केले जात असल्याने ब्लाॉगच्या माध्यमातून समाचार

आरे वसाहतीतील मेट्रो ३ कारशेड प्रकल्पाकरिता २,७०० झाडांचे कत्तल केलेल्या पापास भाजप आणि राज्य सरकार तसेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन पुर्णतः जबाबदार असल्याचा दावा युवासेना अध्यक्ष तसेच आगामी विधानसभा निवडणुकीकरता निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आरेतील झाडं वाचविण्याचा प्रयत्न तसेच त्यासंदर्भातील ठाम भूमिका घेऊन शक्य तवेढा विरोध शिवसेनेने वेळोवेळी केला, असे देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

आरोपांचा घेतला ब्लॉगमधून समाचार

नुकताच एक ब्लॉग आदित्य ठाकरेंनी लिहिला असून या ब्लॉगमध्ये मुंबई महापालिकेत आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना आरेमधील ही झाडं का वाचवू शकली नाही?, असे म्हणत ‘आरे कोण रे?’ असे प्रश्न निवडणुक प्रचारात उपस्थित केले जात असल्याने यावरच हा ब्लाॉग त्यांनी लिहिला आहे. यामाध्यमातून ३ आरोपांवर चर्चा केली आहे. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्याने वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे, राज्याचे पर्यावरण खाते स्वतःकडे असून देखील शिवसेनी विरोधाचे केवळ राजकारण करत आहे आणि तिसरा आरोप म्हणजे ज्या वृक्ष प्राधिरणाने वृक्षतोडीस मंजुरी दिली ते शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेचे आहे.

- Advertisement -

‘मुंबईच्या २०३४ पर्यंतच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे वसाहत ना विकास क्षेत्र असून त्यात बदल करून कारशेडची जागा त्यातून वगळण्याचा प्रस्ताव आला तेव्हा महापालिकेने यास नकार दिला. मात्र नगरविकास खात्याने हा बदल मंजूर केला. त्या खात्याशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. राज्याचे पर्यावरण खाते शिवसेनेकडे असले तरी आरे वृक्षतोडीच्या विषयाशी या खात्याचा संबंध नाही’, असे आदित्य ठाकरे यांनी यामध्ये लिहिले आहे.


हेही वाचा – आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -