मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं दाढी ठेवण्यामागचं कारण; म्हणाले, दाढीमध्ये ‘राज’…

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं दाढी ठेवण्यामागचं कारण; म्हणाले, दाढीमध्ये ‘राज’…

CM Eknath Shinde told reason the behind this the beard

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल, गुरुवारी राज्यपालांच्या भेटीला गेले आणि राजकीय चर्चांना वेग आला होता. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावरील निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची घेतलेली भेट यामुळे राजकीय चर्चांना वेग आला होता. शिवसेनेतील मातब्बर नेते शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत वेगळी चूल मांडली आणि भाजपसोबत युती करत ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि राज्याला दाढी असणारे पहिले मुख्यमंत्री लाभले. त्यांच्या दाढीची अनेकदा चर्चा होत राहिली आहे. आता दाढी ठेवण्यामागचं नेमकं कारण काय? तसचं दाढीवरुन हात फिरवण्यामागंचं कारण काय? त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिंदे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘महाकट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते. (  CM Eknath Shinde told reason the behind this the beard )

तुम्ही दाढीवरुन हात फिरवता तेव्हा अस्वस्थ असता की कोणत्या Operationची आठवण येते? असा प्रश्न विचारल्यावर  मुख्यमंत्र्यांनी दाढी ठेवण्यामागचं आणि दाढीवरुन हात फिरवण्यामागचं कारण सांगितलं आहे.

शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांची दाढी लोकप्रिय होती आणि त्या दाढीत इतकं गूढ असायचं. मी त्यांच्यासोबत खूप जवळून काम केल्याने मलाही त्यांच्या दाढीची भूरळ होतीच. तसंच, दिघे साहेब हे दाढीवरुन हात फिरवत अनेक सिग्नल द्यायचे आणि करेक्ट कार्यक्रम करायचे.

तसंच, दाढी असल्याचा एक फायदा असा की, माणसाच्या मनात काय आहे, ते चेहऱ्यावर दिसत नाही, असं म्हणत त्यांनी दाढी ठेवण्यामागचं कारण सांगितलं.

( हेही वाचा: शरद पवारच अध्यक्ष, ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष )

बाळासाहेब ते पंतप्रधानांपर्यंत दाढीची क्रेझ 

तुमच्यासारखीच दाढी श्रीकांत शिंदे ही ठेवतील का? असं विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ज्याची त्याची चाॅईस, पण सध्या दाढीची क्रेझ आहे. आनंद दिघे यांची दाढी लोकप्रिय होती, त्यांना ठाण्याची दाढी बोललं जायचं. आता मलाही दाढी म्हटलं जातं. एवढचं काय बाळासाहेब ठाकरेंचीदेखील दाढी होती. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील दाढी आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाढीचाही उल्लेख यावेळी केला.

First Published on: May 5, 2023 9:09 PM
Exit mobile version