कोरोना लसीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक

कोरोना लसीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आज दुपारी ३ वाजता वर्षा बंगल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे. राज्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने बुधवारी मोफत लसीकरणाची घोषणा केली. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी लसीचा साठाच पुरेसा उपलब्ध नाही आहे. या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने काल राज्यातील सर्व पात्र व्यक्तींचं लसीकरण मोफत केलं जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, राज्यात लसींचा तुटवडा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची आरोग्य विभागासोबत आहे. तर ४.३० वाजता राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोरोनासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आहे. या बैठकीतून कोरोनाची स्थिती, समस्यांचा मागावा आणि आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.

सरसकट मोफत लसीकरण, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष १८ ते ४४ अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात १ मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल १२ कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर ६ हजार ५०० कोटी रुपयांचा भार असणार आहे.

 

First Published on: April 29, 2021 2:38 PM
Exit mobile version