मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील एच.एन.रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवू लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यावर १२ नोव्हेंबर रोजी छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांना काही दिवस रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागली. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या(मंगळवार) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर एच.एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८.४५ वाजताच्या दरम्यान डॉक्टरांनी टीम ऑपरेशन सुरू केलं आणि त्यानंतर ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं. मात्र, आता मुख्यमंत्री घरी जाऊन आराम करू शकतात. असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.


हेही वाचा: T20 World Cup 2021: १७ नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, ‘या’ सहा खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा


दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावरील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील कक्षात हलविण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

First Published on: November 15, 2021 7:49 PM
Exit mobile version