घरक्रीडाT20 World Cup 2021: १७ नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, 'या' सहा...

T20 World Cup 2021: १७ नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, ‘या’ सहा खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा

Subscribe

उत्तरार्धीयांची एक नवी टीम समोर...

नवी दिल्ली : १७ नोव्हेंबरपासून टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात होणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२१ गमावल्यानंतर भारतीय संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीचं युग आता संपलं आहे. उत्तरार्धीयांची एक नवी टीम समोर आली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा दर्जा उंचावण्यासाठी आणि तीन आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी एक नवीन मजबूत नेतृत्व गट स्थापन करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये काही खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता आहे. नवीन संघ व्यवस्थापनाकडून जशी अचूकता, विवेक आणि पारदर्शकता अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे कुचकामी खेळाडूंना बाहेर काढण्याची योजना देखील आहे. परंतु या मालिकेमध्ये जागा बनवण्यासाठी सहा खेळाडूंना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच या सहा खेळाडूंवर सर्वांची खास नजर असणार आहे.

कोण आहेत हे सहा खेळाडू?

भुवनेश्वर कुमार: भुवनेश्वर कुमारसाठी २०२१ हे वर्ष चांगलं राहिलेलं नाहीये. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्याच्या दौऱ्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. भुवनेश्वरच्या फिटनेसवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएल २०२१ मध्ये भुवनेश्वरला ११ सामन्यांत फक्त ६ विकेट घेता आल्या होत्या. परंतु टी-२० वर्ल्ड कप २०२१ ने भुवीचं टेन्शन वाढवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आपलं चांगलं प्रदर्शन दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

अक्षर पटेल: अक्षर पटेलसाठी २०२१ हे वर्ष आनंदीत गेलं. वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत हा अष्टपैलू हिरो बनला होता. तसेच ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा दुखापतीने त्रस्त असल्यामुळे अक्षर पटेलला संधी मिळाली होती. आयपीएलमध्येही या क्रिकेटपटूने दिल्ली कॅपिटल्ससाठी स्वत:ला सिद्ध केले आहे. डाव्या हाताच्या उत्तुंग फिरकीमुळे त्याला २०२१ च्या हंगामात १२ सामन्यांमध्ये एकूण १५ गडी बाद केले होते. त्याच्या उत्तुंग कामगिरीमुळे त्याच्यासाठी मार्ग खुला झाला आहे.

अजिंक्य रहाणे : न्यूझीलंड विरूद्धच्या आगामी सामन्यात अजिंक्य रहाणेला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मागील दोन वर्षांतील कामगिरीमुळे त्याचे कसोटी संघातील स्थान प्रदीर्घ काळ गंभीर संकटात सापडले आहे. मागील वर्षी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात अजिंक्य राहणेच्या कर्णधारपदाखाली भारताने मालिका जिंकली होती. परंतु इंग्लंडविरुद्धच्या ४ कसोटी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी खेळी करता आलेली नाहीये. त्यामुळे प्लेईंग-११ बाबत त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

रिद्धिमान साहा: रिद्धिमान साहाला टीम इंडियाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे. कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु अलिकडच्या काळात ऋषभ पंतच्या आगमनानंतर साहाची स्थिती चांगली राहिलेली नाहीये. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात पंतला आराम दिल्यानंतर भरतला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविचंद्रन अश्विन: फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसाठी पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणे खूप कठीण झाले आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून या क्रिकेटपटूला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाजूला करण्यात आले होते. परंतु २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकापूर्वी त्याला टी-२० संघात समाविष्ट करण्यात आले होते. आयपीएलमध्ये त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे त्याला भारताचा मुख्य फिरकीपटू आणि उपकर्णधार म्हणून ओळखलं जातं.

चेतेश्वर पुजारा : चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीतही अलीकडच्या काळात अनेक चढ-उतार पहायला मिळाले आहेत. त्याची खेळण्याची गती कमी असल्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकेची झोड होत होती. कसोटी सामन्यामध्ये तो चांगलं प्रदर्शन करीत असला तरीसुद्धा तो खरा हिरो ठरत नाहीये. त्यामुळे अशा स्थितीत त्याचे स्थानही संशयास्पद आहे.


हेही वाचा: मुस्लिम बोलला असता तर मारून तुरूंगात…देशद्रोह मुस्लिमांसाठीच ? कंगनाच्या वक्तव्यावर ओवेसींचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -