Lockdown: नाईलाजाने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

Lockdown: नाईलाजाने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढला, निर्बंध वाढवणे हा नाईलाज - मुख्यमंत्री

राज्यातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक नेत्यांनी लस घेतली. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेकांनी कोरोनाची लस घेतली. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी कोरोना लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना लस घेण्याची विनंती केली. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना वाढत असल्याची चिंता व्यक्त करत लॉकडाऊनचा इशारा दिला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पुढील काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागले. म्हणून कोरोना लसीकरण करून घ्यावी, अशी माझी पुन्हा विनंती आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनावश्यक गर्दी टाळा, बाहेरचं अनावश्यक येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, अंतर ठेवला, हात धुवा. आता आपल्याला पहिल्यापासून कदाचित पुन्हा सुरुवात करावी लागेल. त्यामुळे अजूनही परिस्थिती हाता बाहेर गेलेली नाही. आणि जाऊ नये असे वाटत असेल तर या बंधनाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल.’

लॉकडाऊनबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दरम्यान आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरात ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. १५ ते २१ मार्चपर्यंत नागपूरात लॉकडाऊन असणार आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


 

First Published on: March 11, 2021 1:58 PM
Exit mobile version