आचारसंहितेला १२ दिवस राहिलेत कामाला लागा; दानवेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

आचारसंहितेला १२ दिवस राहिलेत कामाला लागा; दानवेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसहिंतेची घोषणा होऊ शकते. मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागेल असे सांगतानाच आपल्या हातात १२ दिवस उरले असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले आहे.

जालना जिल्ह्यात आज ओबीसी समाजाच्या मेळाव्यात बोलत असताना दानवे यांनी आचारसहिंतेबाबत वरील विधान केले. दानवेंच्या या विधानाबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने आचारसहिंतेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आयोग स्वायत्त संस्था असून सरकारचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसतो. मात्र तरिही दानवे यांना आचारसहिंतेबाबतची माहिती कशी मिळाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

First Published on: September 1, 2019 8:21 PM
Exit mobile version