जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसरया लाटेदरम्यान जिल्हयाचे नियोजन हाताळणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने कहर केला असतांना कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर सोपविण्यात आली. नाशिक जिल्हयात पहिल्या आणि दुसरया लाटेने तर अक्षरशः कहरच केला. पहिल्या लाटेत मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मालेगांवमध्ये कोरोना व्यवस्थापन करतांना प्रशासनाचा अक्षरशः कस लागला. तर दुसर्‍या लाटेत नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. या काळात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा, रूग्णालयातील बेड मॅनेजमेंट करतांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांवर जबाबदारी टाकण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ती यशस्वीपणे पेलली. या काळातही प्रशासनातील अनेक अधिकारी कोरोना बाधित झाले. यावेळी जिल्हाधिकारयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता ती निगेटिव्ह आली. परंतु आता दुसरी लाट ओसरत असतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी मागील तीन दिवस पुणे येथे गेले होते दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी हे पुणे येथून परतले.

दोन दिवसांपासून बैठकांना उपस्थितीत
जिल्हाधिकारी मांढरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मांढरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध बैठकांना उपस्थिती लावली. गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तर शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.

First Published on: July 3, 2021 12:56 PM
Exit mobile version