पिंपरी-चिंचवड लाचप्रकरणावरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली

पिंपरी-चिंचवड लाचप्रकरणावरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांसह चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना अटक केली. दरम्यान, या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी असा थेट संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लाचप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशांनुसार प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी पिंपरी-चिंचवडला जात घडलेल्या प्रकाराबद्दल संबंधीतांशी चर्चा करत माहिती घेतली. मिसळ आपल्याला सविस्तर अहवाल सादर करतील आणि त्यानंतर दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली. दरम्यान, शिवाजीनगर कोर्टाने स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लांडगे यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती. हा प्रकार म्हणजे षडयंत्र असल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे.

First Published on: August 20, 2021 11:24 PM
Exit mobile version