साहित्य संमेलनामध्ये राडा, धर्मविषयक परिसंवाद काही काळ बंद पाडला!

साहित्य संमेलनामध्ये राडा, धर्मविषयक परिसंवाद काही काळ बंद पाडला!

९३वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

उस्मानाबादमध्ये सुरू असलेलं ९३वं मराठी साहित्य संमेलन सुरुवातीपासून वादात आणि त्यामुळे चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या धर्मावरून काही घटकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यामुळे वाद देखील निर्माण झाला होता. त्याचाच पुढचा अध्याय प्रत्यक्ष संमेलनात शनिवारी पाहायला मिळाला. समाजात बुवाबाजीचं प्रमाण वाढत आहे का? या विषयावर आधारीत परिसंवाद सुरू असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही व्यक्तींनी थेट स्टेजवर येत परिसंवादात गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या खासगी सुरक्षारक्षकांनी तातडीने या लोकांना खाली खेचून पोलिसांच्या हवाली केलं आहे. या प्रकरणी आता पोलीस या लोकांची चौकशी करत आहेत.

नक्की घडलं काय?

साहित्य संमेलनामध्ये शनिवारी समाजातील वाढती बुवाबाजी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, परिसंवाद सुरू असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही लोकांनी थेट स्टेजवर येऊन त्यांना देखील बोलू देण्याची मागणी करायला सुरुवात केली. ‘एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून ही चर्चा का घडवली जात आहे?’ अशी विचारणा करत या लोकांनी काही काळ परिसंवाद बंद पाडला. लातूरहून आलेल्या जगन्नाथ पाटील यांनी हा आक्षेप घेतला होता. दरम्यान, जगन्नाथ पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यानंतर परिसंवाद पुढे सुरळीत सुरू झाला.


हेही वाचा – हिटलरशाहीवरून आजी-माजी संमेलनाध्यक्षांमध्ये मतभेद!

दरम्यान, याप्रकरणी संयोजन समितीने वादाचा आरोप केला आहे. फादर दिब्रिटो यांच्या धर्मावरून सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे कोणत्याही कारणाने संमेलनामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा संयोजन समितीकडून करण्यात आला आहे.

First Published on: January 11, 2020 6:33 PM
Exit mobile version