मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी; इंधनदरवाढीवर काँग्रेसची टीका

मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी; इंधनदरवाढीवर काँग्रेसची टीका

मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी; इंधनदरवाढीवर काँग्रेसची टीका

इंधन दरवाढीवर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. सातत्याने केंद्रातील भाजपवर निशाणा साधत आहेत. आज पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे. इंधनावर सर्वांत जास्त कर भारत आकरतो, असा तक्ता काँग्रेसने शेअर केला आहे. हा तक्ता शेअर करताना मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी, असं म्हणत टोला लगावला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलं आहे. यामध्ये एक तक्ता शेअर केला आहे. त्यात देश आणि इंधनावरील कर याची माहिती दिली आहे. यात जर्मनी, इटली, युके, जपान, अमेरिका आणि भारत आहे. इंधनावरील सर्वात जास्त कर भारत आकरतो. इंधनावर २६० टक्के इतका कर भारत आकरतो, असं तक्त्यात म्हटलं आहे. मोदी सरकारच्या कर्तुत्वामुळे भारताची जगात आघाडी असा टोला लगावत या उत्तुंग भरारीसाठी मोदी सरकारचं कौतुक करावं तरी किती? असा उपहासात्मक सवाल देखील केला आहे. एवढंच नाही विकासाच्या बाबतमी नाही पण इंधन दरांच्या बाबतीत मोदींनी भारताला जगात आघाडीवर आणले, असा टोला लगावला.


हेही वाचा – Video: कथनी, करणीमध्ये फरक, हीच ढोंगीजीवींची ओळख; काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा


 

First Published on: February 23, 2021 10:06 PM
Exit mobile version