पंतप्रधानांसारखं मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो…; राहुल गांधींची खोचक टीका

पंतप्रधानांसारखं मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो…; राहुल गांधींची खोचक टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये सध्या राहुल गांधी पायी चालत सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. दरम्यान हिंगोलीत राहुल गांधी यांनी आज सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधानांसारखं मी डायरेक्ट हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो, यानंतर हेलिकॉप्टरने कन्याकुमारीहून श्रीनगरला जाऊन ध्वज फडकवतं म्हणू शकलो असतो भारत जोडो… असा टोला राहुल गांधी यांना लगावला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताचा ध्वज जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जाऊ फडकवणार आहे. देशाचे तुकडे होण्यापासून थांबवणे, विषमता किंवा तिरस्काराची भावना कमी करणे, आणि हिंसाचार थांबवणे हे यात्रेचे लक्ष्य आहे. दरम्यान अनेकांनी सवाल केला की, यासाठी यात्रेची काय गरज होती? आज काल करतात तसं, डायरेक्ट हेलिकॉप्टरने कन्याकुमारी जाऊन, तिथे भाषण करायचं, जसं पंतप्रधान करतात. ज्यानंतर हेलिकॉप्टरने कन्याकुमारीहून श्रीनगरला जात ध्वज फडकवतं सांगू शकलो असतो भारत जोडो… पण यातून फायदा होणार नाही.

भारत जोडो यात्रेची गरज का वाटली, कारण काही दिवसांपूर्वी भाषणात मी माईक बंद करत गमतीत म्हटले, जेव्हा आम्ही लोकसभेत, राज्यसभेत जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, जो तीन काळ्या कायद्याविरोधात असो किंवा नोटाबंदीविरोधात, जीएसटीविरोधात किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवतो त्यावेळी आमचा माईक बंद केला जातो. भाषण सुरु असताना माईक बंद केला तर कोणाला ऐकू येणार? असाच प्रकार राज्यसभेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतो तेव्हा होतो. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी खरोखर माईक बंद करत प्रत्याक्षिक करुन दाखवलं.


तासभर चौकशी आणि 7 लाखांचा दंड; शाहरुख खानला विमानतळावर का थांबवले?

First Published on: November 12, 2022 7:29 PM
Exit mobile version