मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर विश्वास नाही; सचिन सावतांचं टीकास्त्र 

मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर विश्वास नाही; सचिन सावतांचं टीकास्त्र 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी आज काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईतील शाळांमधील एका शिक्षकाला पाठवणे अनिवार्य असल्याचा जीआर राज्य शासनाने जारी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या जीआरसंदर्भातील एक नोट सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवर शेअर केली आहे.

याच मुद्द्यावरून आज सचिन सावंत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर शिंदे फडणवीस सरकारचा विश्वास नाही, असा हल्लाबोल केला आहे.

सचिन सावंत यांच ट्वीट 

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाळांनी एका शिक्षकाला पाठवणे अनिवार्य आहे असा संदेश शासनाने दिलेला दिसतो. पंतप्रधानांच्या तथाकथित लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर तथाकथित लोकप्रिय शिंदे फडणवीस सरकारचा विश्वास नाही हे यातून स्पष्ट होते, असं म्हणत शिंदे फडणवीस सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे तसेच रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले. सोबत मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.


मुंबई पालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स डिपॉझिट करत आपली घरं भरली – फडणवीस

First Published on: January 19, 2023 7:36 PM
Exit mobile version