कॉंग्रेस खासदार राजीव सातव पुन्हा वेंटीलेटरवर, न्यूमोनियाची लागण

कॉंग्रेस खासदार राजीव सातव पुन्हा वेंटीलेटरवर, न्यूमोनियाची लागण

युवा नेता ते बुद्धिमान संसदपटू

कोरोनावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. राजीव सातव यांच्यावर कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील जहांगीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना पुन्हा वेंटीलेटवर ठेवण्यात आल्याची बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचे कळते. खासदार राजीव सातव यांची प्रकृती खाल्यानेच त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. पण कोरोनावर मात केल्यानंतर पुढील उपचार सुरू असतानाच त्यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या त्यांना वेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून देण्यात आली होती. पण त्यांना पुन्हा ऑक्सिजनची गरज भासत असल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. राजीव सातव यांची १० मे रोजी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते यांनी जहांगीर हॉस्पिटल येथे जमायला सुरूवात केली आहे. तर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेदेखील राजीव सातव यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे कळते.

राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतानाच १९ दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे रूग्णालयाकडून सांगण्यात आले होते. राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २२ एप्रिलला कोरोनाची चाचणी केली असता कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांनतर २३ एप्रिलला पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, राजीव सातव यांनी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मोठ्या हिंमतीनं कोरोनावर मात केली.

सातव यांना खूप त्रास झाला. यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते करोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील अशा विश्वास व्यक्त केला होता. राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपुस केली होती. तसेच द्धव ठाकरे यांनी सर्वोतपरी मदत करु असं आश्वासन दिलं होतं.


 

First Published on: May 15, 2021 12:25 PM
Exit mobile version