काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती चिंताजनक

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती चिंताजनक

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

कोरोनामुळे रुग्णालयात असलेले काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्याच्या जहाँगीर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याने २५ एप्रिलला आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृतीत सुधारणा न होता अधिकच खालावली. त्यामुळे सातव यांना २८ एप्रिलला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांना रेमडेसिवीर, टॉसिलीझुमॅब सारखी इंजेक्शन देण्यात आली, अशी माहिती कदम यांनी दिली. राजीव सातव यांची इच्छा शक्ती खूप चांगली असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपुस केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वोतपरी मदत करु असं सांगितलं आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाजवळ गर्दी करु नका असं आवाहन कुटुंबाने केलं आहे.

 

First Published on: April 29, 2021 2:06 PM
Exit mobile version