‘महागाई पर हल्लाबोल’; कॉंग्रेसची भाजपा विरोधात दिल्लीत रॅली

‘महागाई पर हल्लाबोल’; कॉंग्रेसची भाजपा विरोधात दिल्लीत रॅली

मागील काही दिवसांपासून सातत्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत बेरोजगारी आणि जीएसटीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी विरोधात कॉग्रेस आदोलन करणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. ‘महागाई पर हल्ला बोल’ असे या रॅलीचे नाव असणार आहे. (congress party organising mehangai par halla bol rally in ramlila maidan)

‘महागाई पर हल्ला बोल’ असे कॉंग्रेसकडून रॅलीला नाव देण्यात आले आहे. काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून सकाळी 9 वाजल्यापासून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. या रॅलीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल करण्यात येणार आहे.

या रॅलीत दिल्लीशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सकाळी 10 वाजता पक्ष मुख्यालयातून बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. त्याच बसमध्ये बसून राहुल गांधीही सभेला जाण्याची शक्यता आहे.

7 सप्टेंबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रेचे काँग्रेसकडून आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी उद्याचे आंदोलन होणार आहे. देशातील वाढत्या महागाईवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. महागाई आणि बेरोजगारी हे सर्वसामान्यांचे प्रश्न असून ते प्रत्येक व्यासपीठावर मांडणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.


हेही वाचा – बुलडाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात राडा, शिंदे आणि ठाकरे गट भिडले

First Published on: September 4, 2022 9:24 AM
Exit mobile version