Appa Londhe Murder Case: गुंड अप्पा लोंढे हत्या प्रकरणात साक्षीदारांच्या हत्येचा कट उधळला

Appa Londhe Murder Case:  गुंड अप्पा लोंढे हत्या प्रकरणात साक्षीदारांच्या हत्येचा कट उधळला

संपूर्ण राज्यात गाजलेल्या कुख्यात गुंड अप्पा लोंढे हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. येरवडा कारागृहात असलेल्या या प्रकरणातील आरोपीनेच साक्षीदारांना संपववण्याचा कट रचला होता. यासाठी आरोपीने कारागृहातूनच सुपारी दिल्याचं समोर आलंय. सुपारी देऊन या प्रकरणातील साक्षीदारांना संपवण्याचा कट पोलिसांनी चांगलाच उधळून लावलाय.

एक वर्षापूर्वी पुण्यातल्या उरळी कांचन इथे कुख्यात गुंड अप्पा लोंढे यांची हत्या झाली होती. तेव्हापासून हे हत्या प्रकरण चर्चेत राहिलं. सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना रस्त्यावर गुंड अप्पा लोंढे यांच्या गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी संतोष मिनराव शिंदे, निलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनिल महाडिक, विष्णू यशवंत जाधव, आणि नागेश लखन झाडकर यांना त्यावेळी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ हा येरवडा कारागृहात असून त्याने या प्रकरणात साक्षीदारांनी साक्ष दिली तर आपल्याला शिक्षा होऊ शकते म्हणून सुपारी देऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करत असतानाच त्याने वेळ साधत त्याच्या जवळच्या मित्रांना ही सुपारी दिली होती. ते मित्र सुद्धा पोलीस अभिलेखावर गुन्हेगार आहेत.

लोणी काळभोर पोलीस शनिवारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी निखीत पवार यांना एका खबऱ्याकडून या कटाची माहिती मिळाली. त्यानुसार सुनियोजीत सापळा रचून लोणी काळभोर पोलीसांनी उरळी कांचन इथे गावठी कट्टा आणि धारदर शस्त्रांसह दोन आरोपींना रंगेहाथ पकडलं. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, अशी हत्यारे आढळून आली. या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता आणखी दोन साथीदारांची नावे पोलिसांना कळली. आशिष अनिल वरघडे, उद्धव राजाराम मिसाळ, सुरज सतीश जगताप आणि किशोर उर्फ शिवा छबु साळुंखे या कुख्यात गुंडांची नावं आहेत.

कुख्यात गुंड अप्पा लोंढे यांची बारामती, दौंड, हवेली तसंच संपूर्ण जिल्हा आणि इतर परिसरात मोठी दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या प्पा लोंढेवर खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यासारखे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. तर चार गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. २००२ मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. अप्पा लोंढे खुन प्रकरणातील आरोपी गोरख कानकाटे याची निर्दोष सुटका झाली असली तरी विलास लोंढे खून प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

First Published on: February 3, 2023 4:24 PM
Exit mobile version