Corona : पुण्यात ७०३ कोरोनाबाधितांची वाढ; तर २२ जणांचा मृत्यू

Corona : पुण्यात ७०३ कोरोनाबाधितांची वाढ; तर २२ जणांचा मृत्यू

Corona: देवळा तालुक्यात पुन्हा आठ कोरोना बाधित

पुणे शहरात आज, शनिवारी दिवसभरात नव्याने ७०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ४६१ रुग्ण आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५३ हजार ६०० वर पोहोचली असून आतापर्यंत ३ हजार ८०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ११७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ३६ हजार ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये ५२९ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. येथे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८३ हजार ४३३ वर पोहोचली असून यांपैकी ७७ हजार ७६६ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७०३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान, राज्यात ११ हजार ४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ झाली आहे. राज्यात २ लाख २१ हजार १५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

हेही वाचा –

Hathras Case : सीबीआय करणार हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी

First Published on: October 10, 2020 11:22 PM
Exit mobile version