दुर्दैवी घटना! ऑक्सिजन बेड अभावी सिव्हिल रुग्णालयाच्या उंबठ्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू

दुर्दैवी घटना! ऑक्सिजन बेड अभावी सिव्हिल रुग्णालयाच्या उंबठ्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू

दुर्दैवी घटना! ऑक्सिजन बेड अभावी सिव्हिल रुग्णालयाच्या उंबठ्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू

राज्यात ऑक्सिजन बेड्सवरून रुग्णाला हलवण्यात उशीर झाल्याने दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यात आता नगर जिल्हा रुग्णालयातील आणखी एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. श्रीरामपूरहून आलेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णाला वेळेत बेड न मिळाल्याने त्याचा रुग्णालयाच्या उंबठ्यावरच मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा मृतदेह दोन तास वाहनात पडून होता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांता बेड उपलब्ध होऊ न शकल्याने नगरच्या सिव्हिल रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिकेतच रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती.

या रुग्णाची स्थिती अधिक खालवल्याने त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईक खासगी वाहनातून रुग्णाला रुग्णालयात घेऊन आले. मात्र यावेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी रुग्णाचे नातेवाईकांनी शहरातील अनेक रुग्णालय फिरले. मात्र कुठल्याच बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथे आणताच रुग्णाचा रुग्णाचा मृत्यू झाला. याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. परंतु मृत्यूनंतरही रुग्णाला नरक यातना सहन कराव्या लागल्या. कारण रुग्णालय प्रशासनाने तब्बल दोन तासांनानंतर रुग्णाचा मृतदेह रुग्णालयात घेतला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच पडून होता असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

अहमदनगरमधील सर्व रुग्णालयांमध्ये भर्ती होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना ८० टक्के बेड्स कोरोनै रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले असले तरी आधीच सर्वाधिक बेड्स फुल आहेत. शिवाय या रुग्णालयांमधील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्याही अपुरी आहे.


 

First Published on: April 12, 2021 5:19 PM
Exit mobile version