‘एचएएल’मध्ये कोरोनाचा शिरकाव

‘एचएएल’मध्ये कोरोनाचा शिरकाव

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आता हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीतील कर्मचार्‍यांसह रूग्णालयातील कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एचएएल रूग्णालयातील १६ कर्मचारी कोरोनाबाधित असून उर्वरित ८४ रूग्णांमध्ये एचएएल कंपनीतील कर्मचारी व त्यांच्या नातलगांचा समावेश आहे. नाशिक महानगरातील कर्मचार्‍यांच्या एका नातलगाचा मृत्यू झाला आहे. शंभरपैकी ४० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित ६० रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निफाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे यांनी दिली.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही ५५ वर्ष जुनी कंपनी असून यामध्ये जवळपास हजारो कर्मचारी आहेत. त्यातील अनेक कर्मचारी नाशिक महानगरात वास्तव्यास आहेत.एचएएल कंपनीमधील काही कर्मचारी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारार्थ त्यांना एचएएल रूग्णालयात दाखल केले असता रूग्णालयातील १६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

First Published on: August 5, 2020 1:47 PM
Exit mobile version