कोरोनाचे रुग्ण वाढतायत, कठोर निर्णय घ्यावे लागणार – अजित पवार

कोरोनाचे रुग्ण वाढतायत, कठोर निर्णय घ्यावे लागणार – अजित पवार

कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील असं अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. आठवड्यात दुपटीनं रुग्णवाढ होत आहे. कोरोनाबात खबरदारी घेतली जात नाही आहे. मास्क वापरलं जात नाही. याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोरोनाबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी शिवजयंतीवरुन राजकारण करु नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

शिवजयंती मर्यादित लोकांमध्ये साजरी करा. एका ठिकाणी १०० व्यक्ती असाव्यात असं देखील सरकारने सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. शिवजयंतीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी शिवजयंतीवर बंधनं का आणता? असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कोरोनाचं सावट आल्यावर आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं, कोरोनाचा फैलाव होऊ नये हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण याआधी महान व्यक्तींच्या जयंत्या, सण साधेपणाने साजरे केले. त्यामुळे कृपा करुन शिवजयंतीवरुन राजकारण करु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

 

First Published on: February 15, 2021 5:15 PM
Exit mobile version