करोना : मुंबईत २ रुग्ण व्हेटिंलेटरवर

करोना : मुंबईत २ रुग्ण व्हेटिंलेटरवर

आरोग्य मंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात सध्या करोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान, गर्दीमुळे सर्वात जास्त संसर्ग पसरण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. गेल्या १२ तासांत ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाढलेली संख्या पाहता संसर्ग पसरुन रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर, २ रुग्ण व्हेटिंलेटरवर असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचेही टोपेंकडून सांगण्यात आले आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण

२२ वर्षीय तरुणी लंडनहून मुंबईत आली आहे. तिच्यावरही उपचार सुरू आहेत. तर, ५२ वर्षीय व्यक्ती अहमदनगरमध्ये आढळला आहे. त्याने दुबईहून प्रवास केला आहे. या दोघांमुळे राज्याचा आकडा ४९ वर पोहोचला आहे.

संसर्ग होऊन पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण कमी

५० पैकी १० रुग्ण संसर्गाने ग्रस्त झाले आहेत. पण, ४० हे बाहेरुन आलेले रुग्ण आहेत. त्यामुळे, जर संसर्ग थांबवायचा असेल तर गर्दी थांबणे गरजेचे आहे. लोकलमधून संसर्ग वाढण्याचा सर्वात जास्त धोका आहे. पण, महाराष्ट्रात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याने ही एक दिलासादायक बाब असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तपासणींसाठी खासगी लॅबने स्वत: खर्च केला तर परवानगी दिली जाईल. लोकांनी कार्यालयात जाणे टाळले पाहिजे. संबंधित खात्याच्या सचिवांनी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांनी ५० टक्के उपस्थितीचे पालन करावे. संसर्ग टाळण्यासाठी १२ देशांना बंदी घालण्यात आली आहे. होम क्वॉरंटाईन असलेल्यांनी बाहेर फिरु नये, योग्य वेळी योग्य निर्णय घेतली जातील असेही टोपे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात जाणार नाही

महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात जाणार नाही, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करुनही गर्दी कमी होत नसेल तर रेल्वे बंद करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, असेही टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे, सर्वांनी काळजी घ्या, अनावश्यक गर्दी टाळा आणि जर गर्दी कमी झाली नाही तर सरकारला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावे लागतील आहे. सध्या महाराष्ट्राचा आकडा ४९ वर पोहोचला असून सुदैवाची बाब एवढीच की महाराष्ट्रात संसर्गाचा धोका कमी आहे. ४९ पैकी ४० जण बाहेरुन आले आहेत आणि बाकी ९ जणांना संसर्ग झाला आहे.


हेही वाचा – माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो… कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं ?


 

First Published on: March 19, 2020 1:30 PM
Exit mobile version