Coronavirus: गोव्यातील काही गावांनी स्वतः केला लॉकडाऊन जाहीर!

Coronavirus: गोव्यातील काही गावांनी स्वतः केला लॉकडाऊन जाहीर!

Coronavirus: गोव्यातील काही गावांनी स्वतः केला लॉकडाऊन जाहीर!

देशभरात लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. चार टप्प्यात देशात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील काही लोकांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गोव्यातील सत्तारी आणि बिचोलिममधील काही गावांनी पुढील चार दिवस लॉकडाऊनमध्येत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील सत्तारी तालुक्यातील केरी गाव कर्नाटक सीमेला लागून आहे. या गावाने मंगळवारी लॉकडाऊन जाहीर केला. तसेच बिचोलीम तालुक्यातील पाले गाव आणि सांखळी विधानसभा क्षेत्रात दुकानेही बंदी होती. याव्यतिरिक्त केरीसह इतर काही गावांमध्ये चार दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्य आरोग्य सचिव नीला मोहनन म्हणाल्या की, ‘स्वतः लॉकडाऊन जारी करण्याची गरज नाही.’ तर राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, ‘काही केसेस समोर आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असून काही ठिकाणी लोकांची तपासणी करणे सुरू आहे.

गोव्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३५९ असून २९२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी १०८ रुग्ण राज्याबाहेरील आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.


हेही वाचा – Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोना येतोय नियंत्रणात


 

First Published on: June 10, 2020 6:58 PM
Exit mobile version