Corona : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना

Corona : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना

बाळासाहेब पाटील

मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्याचे सहकार मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याचे समजते. काल त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून हा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळासाहेब पाटली यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तर खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा हे सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून २४ तासांत ६५ हजार २ नव्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता २५ लाख २६ हजार १९३ वर पोहोचली आहे. तर यापैकी Active केसेस ६ लाख ६८ हजार २२० इतके आहेत. तर आतापर्यंत १८ लाख ८ हजार ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४९ हजार ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकिताचे सडेतोड उत्तर

First Published on: August 15, 2020 12:46 PM
Exit mobile version